March 5, 2021

Know About Them

Its good to know about someone

मनसेने केला राम कदमांचा “हे राम”

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. मुंबईतील चांदिवली विधानसभेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

नांदेडमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश

जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

शहापूर तालुक्यातही ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली. (Avinash Jadhav give volt to Ram Kadam BJP volunteers join MNS)

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत

गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat