March 5, 2021

Know About Them

Its good to know about someone

बाबाज् थिएटर्स आयोजित लोकोत्सव सोहळ्याचे आज उद्घाटन

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  


नाशिक (प्रतिनिधी) : 
बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार (७) पासून “लोकोत्सव २०२१” सांस्कृतिक सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प. सा. नाटयगृहात सायंकाळी ६ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून श्री कपिकुल
सिध्दपिठमच्या प्रमुख वेणाभारती आणि उपमहापौर भिकुबाई बागुल उपस्थित राहणार आहेत. दि. १३ पर्यंत दररोज भरगच्च कार्यक्रमांची विनामूल्य मेजवानी मिळेल.
लोकनेते सुनील बागुल आणि युवानेते मनीष बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त या सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
लोकोत्सवाच्या प्रारंभी आज आर.एम.ग्रुप प्रस्तुत “रंग मऱ्हाटमोळा ” हा लोकसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. ३५ कलाकार नृत्य, गायन वादनाने त्यात रंग भरतील. बाबाज् थिएटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे  आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर बागुल यांनी नाशिककर रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण सोहोळयात कोविडच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येईल. राजेश पिंगळे,नारायण गायकवाड, सदानंद जोशी, सचिन दप्तरी, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रवीण कांबळे, जगदीश जंगम, विजय राजेभोसले, विकास बल्लाळ, कैलास पाटील आदी कार्यकर्ते सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. दि. ११ ते १३ दरम्यान बाबाज् करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होईल. त्यामध्ये निवडक ३० एकांकिका बघण्याची संधी नाशिककर रसिकांना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat