April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

भाजपा आणि राष्ट्रवादीने केल मनसेच समर्थन

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ठाणे महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला यावेळी पालिकेत गोंधळ पहायला मिळाला.भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.व एका प्रकारे मनसेला समर्थनाच करण्यात आल. शिवसेनेचा उल्लेख ‘चोर कंपनी’ करत आयुक्तांसमोर घोषणा देण्यात आल्या. गेल्या वर्षी विकास कामं ठरवताना शिवसेनेने डावललं असल्याचा आरोप भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून यावेळी करण्यात आला.

ठाणे पालिकेत गेल्या वर्षी ३७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र, यंदा करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प २८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. जवळपास नऊशे कोटींनी अर्थसंकल्प कमी झाला आहे. ठाणे करावर करवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी, काटकसरीचा असल्याचं पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी म्हटलं आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षांचा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, गेल्या वर्षी करोना संकटामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेलं नाही. त्यातच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा ३७८० कोटी रकमेचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. ४९.३० लाख अखेरच्या शिलकेसह १८४२.११ कोटी महसुली खर्च आणि १९३७.४० कोटी भांडवली खर्चाचा हा अर्थसंकल्प होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat