May 6, 2021

Know About Them

Its good to know about someone

“या” दिवशी सुरू होणार कॉलेज !

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारपरिषदेतून दिली. ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक  नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरू होत असताना यूजीसीने देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास करोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.

यावेळी उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असायला हवी. यूजीसीने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालयं सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat