April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

कल्याण डोंबिवलीसाठी राज ठाकरे “इन ॲक्शन”

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार तडाखा बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.

राज ठाकरे यांची नुकतीच पक्षातील नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील मनपा वॉर्डची संपूर्ण जबाबदारी या समितीवर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat