September 25, 2021

Know About Them

Its good to know about someone

जामनेर मध्ये पुन्हा गिरीश महाजन , खडसे मागे पडले

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जामनेर – जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे जलाल सुलेमान तडवी (चिंचखेडा-तवा) यांची आज एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.पंचायत समितीच्या सभागृहामधे दुपारी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेच्या पिठासीन अधिकारीपदी तहसिलदार अरूण शेवाळे होते.सहायक अधिकारी म्हणुन गटविकास अधीकारी कवडदेवी होत्या.याच बरोबर पंचायत समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.
सभापती निवडीनंतर माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचीत सभापती जलाल तडवी यांचा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याकडून शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जेष्ठनेते अॅड शिवाजी सोनार, माजी सभापती छगनराव झाल्टे,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,सरचिटणीस रवींद्र झाल्टे,आनंदा लाव्हरे, जिपसदस्य रजनी चव्हाण उपस्थित होते. तर पंचायत समिती सदस्यांपैकी मावळत्या सभापती सुनंदा पाटील,रुपाली पाटील, सुरेश बोरसे,निता पाटील,संगीता पिठोडे,प्रल्हाद पाटील,नवल पाटील,आ महाजनानचे स्वीय सहायक दिपक तायडे, विलास पाटील, गोपाळ नाईक, कमलाकर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat