काँग्रेस विरोधात देशातील अजून एक नेता संतापला. यांचा मुळेच् मी मुख्यमंत्री नाही ….
1 min read
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस ल पुन्हा सुनावल आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले की “भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असं म्हणत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर संतापाचा वर्षाव केला आहे .
मैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं,” असं कुमारस्वामी म्हणाले.