May 1, 2021

Know About Them

Its good to know about someone

विशेष लेख – हम होंगे कामियाब …….!

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

लेखक – प्रणव काफरे

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम्
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते

“मी मातृभूमी ला सलाम करतो, जिथे मी सुखात राहतो. जिच्यासाठी मी माझ्या शरीराचा त्याग करण्यास नेहमीच तयार
आहे, अशा माझ्या भारत मातेला माझे अभिवादन !” नमस्कार मंडळी ! विकसनशील देश म्हणून जगात ओळखल्या जाणार्‍या आपल्या भारत गणराज्याच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

१९४७ च्या दरम्यानची परिस्थिती कशी होती ?

८०० वर्षे परकीय हल्लेखोर आणि १५० वर्षे ब्रिटिश राजवटीने आमची मातृभूमी पार उद्ध्वस्त झाली होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या 40 वर्षांपर्यंतचा जीडीपी विकास दर प्रति वर्ष फक्त १ ते २% होता. अन्नाची कमतरता मोठ्या प्रमाणात होती आणि त्या काळी अन्नाचीही आपण आयात करत होतो. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे ४० लाख बंगालींचा अन्नाअभावी मृत्यू झाला. ९०% पेक्षा जास्त भारतीय लोकसंख्या ही गरिबी रेषेच्या खाली होती. बँकांची बँक समजल्या जाणाऱ्या आरबीआय वर ५०० करोड रुपये कर्ज होते. भारतीयांचे वेतन फारच कमी होते उदाहरणार्थ एका सामान्य कारकुनाला फक्त १३ रुपये प्रति महिना वेतन दिले जात होते.. भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, म्हणून त्यांच्याकडे ज्या पद्धतीने रचना केली गेली, त्याप्रमाणे प्रत्येकजण त्यांचा गुलाम होता, सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार केले गेले, निषेध दडपला गेला, जे त्यांच्या विरोधात गेले त्यांना शिक्षा झाली, सार्वभौमत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता नष्ट झाली. त्यांनी स्वत: चा बचाव करण्यासाठी स्वतःचे कायदे सादर केले. त्यांनी भारताला लुटले आणि कोहिनूर हिरा देखील काढून घेतला, नीळ उत्पादन वाढले ज्यामुळे आपली माती नापीक बनू लागली, अत्याचार शिगेला पोहचले, दुष्काळ, मानवतेविरूद्धचे गुन्हे तर सामान्यच होते. स्वातंत्र्याच्या वेळी, भारतीयांचे सरासरी आयुर्मान फक्त ३१ वर्षे होते. जे सध्या ६८ वर्षे इतके आहे. साक्षरता फक्त १०% होती. म्हटले जाते की, सरासरी २५० किमी मध्ये केवळ एकच वाचू किंवा लिहू शकणारी व्यक्ती मिळेल इतकी भयंकर असाक्षरता होती . आता साक्षरतेचे प्रमाण ६८% इतके आहे, यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या सर्वात कमी साक्षर राज्यांचा देखील समावेश आहे. सतत दुष्काळ आणि पूर, उपासमार या आपत्ती मुळे होणारे मृत्यू सामान्यच होते. अश्या प्रकारची अतिभयंकर परिस्थिती त्याकाळी होती. दलितांना व आदिवासींना अस्पृश्य आणि हिन समजले जात होते. समाजाने त्यांना तर वाळीतच टाकले होते. परंतु याच दलीत समाजातून आपले कर्तृत्व गाजवनारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रात आरक्षण देऊन त्यांसाठी “लेव्हल प्लेईंग फील्ड” निर्माण केली, आणि समानते पेक्षा समतेच्या मुल्यास दुजोरा दिला. टाटा स्टील आणि काही हातमाग , कापड आणि तेल गिरण्या वगळता उद्योगधंदे नव्हते. स्वातंत्र्यानंतर आपण वीज प्रक्रिया, मोठे स्टील प्लांट्स, मशीन आणि उपकरणांचे उत्पादन आणि बरेच काही उभारून औद्योगिकीकरनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यातच मेक इन इंडिया सारख्या योजनांतून भारत “उत्पादक प्रदेश” म्हणून जगात आपली ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्यानंतरच सरकारने मोठ्या प्रमाणात राष्ट्रनिर्मितीची कामे सुरू केली आणि हळूहळू रोजगार निर्मितीला सुरुवात झाली आणि आपल्याकडे व्यवसाय आणि उद्योगांची प्रगती होऊ लागली.

एवढ्या भयानक परिस्थितींचा सामना करून आतापर्यंत भारताने नेमके किती यश मिळवले ?

एकता आणि अखंडता टिकवून ठेवली – स्वातंत्र्यानंतरची ही भारताची सर्वात महत्वाची कामगिरी आहे. सुमारे ७ दशके नेहमीच उद्भवणारी युद्ध परिस्थिती आणि दहशतवादाशी संबंधित कठोर आव्हाने असूनही भारत आपल्या आधुनिक नकाशावर टिकून आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशी आव्हाने असूनही भारताची धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता कायम आहे. भारताची लोकशाही – शेजारी मित्र राष्ट्रांसोबत असलेले कलह शांततेच्या मार्गाने सोडवत आणि जर वेळ आलीच तर सर्जिकल स्ट्राईक सारखा आक्रमक पवित्रा घेत सोडवत भारताने आपली सुरक्षा आणि अखंडत्व अबाधित ठेवले आहे. भारत हा एक धडधडणारा आणि धडकी भरवणारा लोकशाही देश आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास आला आहे. सर्व सामान्य नागरिकांचे हित – नागरिकांना सबळ करण्याच्या उद्देशाने अनेक योजना सरकारतर्फे राबवण्यात आल्या आहेत .या यादीच्या शीर्षस्थानी पंतप्रधान ग्राम सडक योजना, माहितीचा अधिकार (आरटीआय), शिक्षण हक्क (आरटीई) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यांचा समावेश होतो. राईट टू मेडिकेअर, राईट टू फूड आणि निवाऱ्याचा अधिकार अश्या इतर अनेक हक्कांचा मार्गही निश्चितपणे लवकरात लवकर सुकर होईल जे भारतीय घटनेत समाविष्ट आहेत परंतु अद्याप देण्यात आले नाहीत. मी सहमत आहे की वरीलपैकी बहुतेक कार्यक्रम यशस्वीरित्या अंमलात आले नाहीत, परंतु त्याची दृष्टी आणि ध्येय भारतातील रहिवाशांच्या बाजूनेच होते. हे केवळ आपल्या राजकारण्यांचे आणि नोकरशाहीचे अपयश आहे की आपण या योजना यशस्वीरित्या अंमलात आणू शकलो नाहीत. अणु व क्षेपणास्त्र क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय प्रगती – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे पराक्रम हे अधिक लक्षणीय आहेत. अणु आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा यात मोठा वाटा आहे. भारत दोन्ही क्षेत्रात एकाच वेळी आणि यशस्वीरित्या चोख कामगिरी बजावत आहे. भारताच्या क्षेपणास्त्र प्रगतीचे नेतृत्व अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग या क्षेपणास्त्र यंत्रना करीत आहेत. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस हे भारतीय क्षेपणास्त्र भारताच्या ताफ्यात सर्वात नवीन जोड आहे. भ्रष्टाचार, वाढती लोकसंख्या , दारिद्र्य, निरक्षरता, आणि बेरोजगारी ही देशापुढील आता मोठी आव्हाने आहेत. मला या सर्व माहितीतून एक गोष्ट आपल्या नजरेस आणायची आहे ती म्हणजे आपण विविध मध्यामांद्वारे ऐकतो की आपल्या देशाचा विकास किती धीम्या गतीने सुरू आहे. पण आपण वरील सर्व माहितीची तुलना केल्यास आपल्याला देशाच्या प्रगतीचा नेमका अंदाज येईल.सध्याच्या काळात अफवा किंवा चुकीची माहिती पुरवून नेटकरी सामान्य नागरिकांना सरकार विरुद्ध किंबहुना देशा विरुद्ध अशांतता पसरविण्यास भाग पाडतात. या सर्व आधुनिक युगाच्या आधुनिक समस्या आहेत. त्यामुळे माझी आपणा सर्वांना इतकीच विनंती असेल की, यापुढे कोणतीही माहिती फॉरवर्ड करताना किंवा मिळालेल्या कोणत्याही माहिती वर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून कोणताही निर्णय घ्या. कारण आपला एक फॉरवर्ड पालघर सारखे मॉब लिंचींग किंवा देशद्रोहाचा गुन्हा आपल्या हातून नकळत घडवू शकतो. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांची साथ लाभल्यास देशाच्या प्रगतीच्या वाटेवरील आत्तापर्यंतचे बदलांतर जितके उल्लेखनीय होते त्यापेक्षाही जास्त गतीने व जास्त प्रभावी पुढील बदलांतर नक्कीच पाहायला मिळतील. व अशीच उत्तरोत्तर राष्ट्रनिर्मितीचे कार्ये होत राहिले तर तोही दिवस दूर नाही जेव्हा भारत एक बलवान महासत्ता म्हणून नावारूपास येईल आणि या प्रगतीत सिंहाचा वाटा आपला सर्वांचा असेल.

1 thought on “विशेष लेख – हम होंगे कामियाब …….!

 1. Wow.. really appreciate the effort of young people remembering the rich heritage of our country and spreading the message as well.. 👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat