April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

राजकीय खळबळ ! पवार-राऊत यांची भेट झाल्याची यांनी दिली माहिती

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली . शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी  संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी भांडुप येथील संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघे संजय राऊत यांच्या घरी गेल्याची माहिती देण्यात आली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. @rautsanjay61 यांची आदरणीय @PawarSpeaks साहेब, आदरणीय @AjitPawarSpeaks दादा यांच्यासमवेत भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे! pic.twitter.com/fEKdp3sKd9

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat