May 6, 2021

Know About Them

Its good to know about someone

कपिल पाटील यांच्या मुळे शहाडचे रस्ते झाले चका-चक !

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मोहोने शेड कोळीवाडा-एनआरसी गेट ते तलाव रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून प्रवास करताना पादचाऱ्यांबरोबरच वाहनांतील प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एमएमआरडीच्या निधीतून रस्ता उभारण्याची खासदार कपिल पाटील यांनी विनंती केली होती. त्यानंतर या रस्त्यासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला. या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या निधीतून मंजूर केलेल्या शहाडमधील १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे हजारो नागरिकांची वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या खड्ड्यातील प्रवासातून सुटका होणार आहे. खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज या रस्त्याची पाहणी केली.
यावेळी वेळी जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, दिनेश तावडे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, राजाभाऊ पातकर, प्रमोद घरत, मनिषा केळकर, रमेश कोनकर, मुक्ता पाटील, संतोष शिंगोळे, राजा आधिवार यांचीही उपस्थिती होती. या कामाला मंजुरी दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले आहेत.

1 thought on “कपिल पाटील यांच्या मुळे शहाडचे रस्ते झाले चका-चक !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat