September 26, 2021

Know About Them

Its good to know about someone

जेव्हा भाजपचेच नेते चंद्रकांत पाटलांना “चंपा” म्हणतात .

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हा किस्सा आहे २०१९च्या विधानसभा निवडणुकी वेळेसचा . राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत्तबर नेते अजित पवार यांनी पुण्याच्या एका सभेत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना “चंपा” असं टोपण नाव दिलं आणि महाराष्ट्रभर चंद्रकांत पाटील यांना चंपा या नावाने ओळख मिळाली.

निवडणुकीचा काळ होता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांना म्हणायचे. चंपा हे नाव महाराष्ट्र भर हिट झालं. आणि अचानक एके दिवशी पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं “दादा, तुम्हाला चंपा हे नाव कसं सुचलं?”. तेव्हा अजित पवार यांनी दिलेले उत्तर गमतीशीर आणि आणि सगळ्यांनाच थक्क करणारं होतं.

अजित पवार म्हणाले, चंपा म्हणजे चंद्रकांत यातला “चं” आणि पाटिल यातला “पा” असा हा फक्त शॉर्ट फॉर्म आहे. जो त्यांना खासगी मध्ये एका भाजापा नेत्यानेच सांगलीला होता. आणि त्या नेत्यांच नाव अजित पवार निवडणुकी नंतर सांगणार आहेत.

आज निवडणूक होऊन वर्ष झालं पण अजित दादांनी नाव काही सांगितलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat