August 2, 2021

Know About Them

Its good to know about someone

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठ भगदाड !

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नाशिक : अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब यांचा भाजपचा पुनर्प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे.बाळासाहेब यांना सोमवारी नाशिकच्या प्रदेश कार्यालयात सन्मानपूर्वक प्रवेश दिला जाणार आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू झाला असला तरी दुसरीकडे विरोधक गटामध्ये नाराजी पसरली आहे.या मुळे नाशिक मध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पाडलेल आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असूनही सानप व समर्थक नगरसेवकांमुळे सत्ता मिळविताना दमछाक झाल्याने आगामी निवडणुकीत अधिक पडझड होऊ नये म्हणून सानप यांना चाल दिल्याचे बोलले जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सानप यांची कारकिर्द बहरली होती. परंतू माजी पालकमंत्री गिरीष महाजन व विधान परिषदे निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या खप्पा मर्जीमुळे सानप यांना हळुवारपणे साईडट्रॅक करण्यात आले. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी मनसेतून एनवेळी ॲड. राहुल ढिकले यांना भाजप मध्ये प्रवेश देताना दुसरीकडे उमेदवारी देखील जाहीर केल्याने नाराज सानप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली. पराभवानंतर सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat