August 4, 2021

Know About Them

Its good to know about someone

शिवसेना आमदाराने केला मोठ्ठा घोटाळा !

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज कल्याणच्या तहसिलदारांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सरनाईक यांच्यावर 250 कोटींच्या घोटाळ्याचा तसेच सरनाईक यांच्या कंपनीने टिटवळ्याजवळील गुरवली गावात 78 एकर जमिन खरेदी केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले की प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने कल्याण तालुक्यातील टिटवाळाजवळ 78 एकर जमीन विकत घेतली. या जमिनीवर जानेवारी 2014 मध्ये ईडीची जप्ती आल्याचे सांगत त्यानंतरही जमिनीमध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला. तसेच पहिला घोटाळा एमएमआरडीएचा 175 कोटींचा, दुसरा घोटाळा विहंग गार्डनमध्ये 13 मजल्याच्या 2 अनधिकृत इमारती बांधून विकून पळून जायचा आणि 3 रा घोटाळा एनएसईलमध्ये 250 कोटींचा असल्याचे गंभीर आरोप सोमय्या यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहेत. तसेच टिटवाळ्याजवळ खरेदी केलेल्या 78 एकर जमीनीची आज आपण पाहणी करत कल्याणचे तहसिलदार यांच्याकडे चौकशीची मागणी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
तर घोटाळेबाजांवर कडक कारवाई झाली पाहीजे अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे उत्तर देणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान प्रताप सरनाईक यांनी सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत विचारणा केली असता सरनाईक यांच्यात हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांची उत्तरं द्यावी आणि 1 रुपयाचा दावा दाखल करून दाखवावा असे खुले आव्हान किरीट सोमय्या यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat