August 4, 2021

Know About Them

Its good to know about someone

रिंगरोड लवकरच पूर्ण होणार – विश्वनाथ भोईर.

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कल्याण- डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या ‘रिंगरोड प्रकल्पा’च्या कामाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. रिंगरोड प्रकल्पाच्या कल्याणातील वाडेघर ते मांडा – टिटवाळा या टप्प्यादरम्यान विस्थापित होणारी घरे, मंदिरं, शेतजमीन आणि वृक्ष या महत्वाच्या अडचणी दूर झाल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्ण होईल अशी माहिती कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.. आमदार भोईर, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्यासह या बैठकीला एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे आणि केडीएमसी नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादनासह विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पात बाधित होणाऱ्या चाळीतील घरांची संख्या जास्त असून त्यांच्या पुनर्वसनासाठी कंत्राटदाराला 2 टीडीआर देण्यात येतील. त्यापैकी एका टीडीआरच्या माध्यमातून कंत्राटदाराने विस्थापितांसाठी चाळ बांधून देण्याची किंवा बांधलेल्या चाळी विकत घेऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. त्याशिवाय प्रकल्पात तुटणारी 7 मंदिरं शेजारील भागात बांधून देण्याचा आणि ताडाची झाडं जाणाऱ्या लोकांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
आज झालेल्या बैठकीतील या महत्वाच्या निर्णयांमुळे महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग येऊन लवकरात लवकर तो पूर्ण होईल असा विश्वास आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.भूसंपादन, प्रकल्पग्रस्त आदी मुद्द्यांवर महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाची गती मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना चर्चेसाठी

सौजन्य – एल एन एन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat