August 4, 2021

Know About Them

Its good to know about someone

गुन्हेगारांविरोधात कल्याण पोलिसांचे “कोंबिंग ऑपरेशन”

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

कल्याण-
रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर लागोपाठ दोन दिवस घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याण पोलिसांकडून याठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये स्कायवॉकवर संशयितरित्या फिरणाऱ्या आणि नशा करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या स्कायवॉकवर काही गर्दुल्ल्यांनी एका तरुणीची छेड काढण्याचा तर परवा रात्री एका तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्याची तातडीने दखल घेत कल्याण एसीपी अनिल पोवार यांनी महात्मा फुले बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील 12 अधिकारी आणि मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तात काल हे कोंबिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये पोलिसांनी कल्याण पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसर, संपूर्ण स्कायवॉक, रिक्षा स्टॅण्ड, वलीपीर रोड पिंजून काढत त्यावर संशयास्पद फिरणाऱ्या आणि नशा करणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतल्याचे एसीपी पोवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat