शेवट नक्कीच सकारात्मक होईल, अमृता फडणवीस यांचे ट्विट
1 min readविधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. भाजपासाठी हा धक्कादायक पराभव असल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. “सध्या सुरूवात वाईट झाली आहे. पण या वाईट सुरूवातीचा शेवट हा नक्कीच चांगला आणि सकारात्मक होईल”, असं ट्विट त्यांनी केलं. यासोबत त्यांनी जय महाराष्ट्र असा हॅशटॅगदेखील वापरला.
ट्विट नक्की वाचा
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1334761046548959232?s=20