April 10, 2021

Know About Them

Its good to know about someone

झाडाझुडपात पशु- पक्ष्यांना धान्य आणि पाण्याची व्यवस्था – ग्रीन फाऊंडेशन

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

उन्हाच्या कडाक्यात पाणी धान्याची व्यवस्था पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे अटत चाललेले आहेत मार्च, एप्रिल महिन्यात पक्ष्यांना खाण्यासाठी ही काही मिळत नाही अशा वेळी ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून लोणी काळभोर, कदम वाकवस्ती,तरडे गाव,थेऊर गाव,या पाच गावात पक्ष्यांणा पाणी आणि धान्य ची 3 महिने व्यवस्था ग्रीन फाउंडेशन करणार आहे.

होळी सना निमित्त लोणी काळभोर येथील माळीमळा दत्त गॅरेज येथून उपक्रम सुरू करण्यात आला आहे . (साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन) श्री.बाळासाहेब कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी धनगर समाज सेवा संस्था कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले साहेब,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर आण्णा रूपनर, हवेली तालुका उपाध्यक्ष धोंडिबा नाना कोळपे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, राहुल कुंभार, किरण भोसले,किरण भाचकर,दिगंबर जगताप,बिरूदेव भास्कर,अमिर सय्यद, भाऊ माळवतकर, हनुमंत दुर्गे,योगेश जगताप,जिवन जाधव,दिपक चव्हाण, उपस्थित होते.
अंतर्गत ग्रीन फाउंडेशन च्या 27 जिल्हातील सर्व पदाधिकारी हा उपक्रम राबविणार आहेत.ग्रीन फाउंडेशन परिसरात पाणवठे तयार करत आहे त्याचबरोबरच पक्ष्यांना खाण्याची व्यवस्था करत आहे पण ती सर्व पशु पक्ष्याना पुरेशी ठरणार नाही त्यामुळे गरज आहे ती सर्व नागरिकाणी पक्षीमित्र होण्याची पाणी आणि अन्नासाठी पक्षांना मदत करण्याची गरज आहे उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी आणि अन्नासाठी पक्षांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था ग्रीन फाऊंडेशन करत आहे. आजच्या डिजिटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पक्षी व पक्ष्यांना निवारा संकटात आला आहे. वन्यजीवांचा चारा-पाण्याची सोय करणे पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे वाढते सिमेंटच्या जंगलात निसर्गावर आक्रमण केलेले गाव शिवारे आणि झाडे ही कमी होऊ लागली आहेत वाढत चाललेले उन्हाचे चटके निष्पर्ण होत असलेली झाडे झुडपे दुर्मिळ होत आहे. पाणीसाठी वन्यप्राण्यांना जगवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पक्षांसाठी पाणी धान्य भाडी ग्रीन फाउंडेशन च्या वतीने मोफत देण्यात येत आहेत.
उन्हाळ्याच्या चटक्याने वन्यजीव पशुपक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. वन्यजीवांची जतन व संवर्धन व्हावे यासाठी ग्रीन फाऊंडेशन बरोबर सर्वांनी पुढाकार घेतला पाहीजे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat