April 10, 2021

Know About Them

Its good to know about someone

विशेष लेख – “म्हणून गरिबांची मुलं एमपीएससी कशी देतात ? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती नाही”

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

गेल्या दोन ते तीन दिवसापासून जर आपण आजूबाजूच्या युवा पिढीशी संवाद साधला असेल तर आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मुलं एमपीएससीची परीक्षा आली म्हणून पूर्ण तयारीने उभे होते. एमपीएससीची परीक्षा द्यायची आणि आपल्या गावाकडे पुन्हा जायचं आपल्या आई-वडिलांना भेटायचं हे सगळं त्यांच्या मनात होतं. याचे मुख्य कारण म्हणजे 80 टक्के विद्यार्थी जे एमपीएससीची परीक्षा देतात ते घरून श्रीमंतच असतात असं नाही. किंबहुना बहुतांश मुलांची घरची परिस्थितीही हालाखीची असते. एमपीएससी देणारी मुलं ही खरं म्हणजे गावाहून शहरात येतात शहरात राहतात, शहरात ठिकठिकाणी एखाद्या खोलीत राहतात. किंवा हॉस्टेल वर राहतात तेच भाडे देतात, मेस लावतात त्याचा भाडे देतात. यामुळे या सगळ्यांच एक बजेट ठरलं असतं, त्यांच्यासाठी एमपीएससीची ठरलेली तारीख ही महत्त्वाची असते कारण त्या तारखेपर्यंतच बजेट विद्यार्थी ठरवतात.
पण अचानक एक घोषणा झाली की एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, ती रद्द करण्यात आली आहे. झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली विद्यार्थ्यांना काय करावं काहीच समजलं नाही. अचानक आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी खचले. आत्ता परीक्षा कधी? आणि ती पुढे ढकलली का? कोरोनाची भीती ही फक्त विद्यार्थ्यांनाच का? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत राव पाटील जेव्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी विदर्भाचा आणि खानदेशचा दौरा करतात तेव्हा कोरोना नसतो का? असा प्रश्न अचानक विद्यार्थ्यांना पडला आणि एका छोट्या आंदोलनाने रूप घेतले.
या आंदोलनाला घाबरत सरकार मधल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका सांगितली परीक्षा व्हायलाच पाहिजे. आणि अचानक सरकारवर दबाव आला . संध्याकाळी नेहमीसारखे उद्धव ठाकरे टीव्ही स्क्रीन वर प्रगट झाले. त्यांनी असं सांगितलं की परीक्षा तर होणार पण त्या पुढच्या आठ दिवसांमध्येच होणार. परीक्षा पुढे जाण्याचे कारण म्हणजे सरकारला परीक्षा घेण्यासाठी लागणारी सुरक्षितता उभी करता आली नाही. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य इतक हास्यास्पद होतं की तुम्ही मुख्यमंत्री बोलता आहात की, असच कोणी तरी म्हणुन हे समजले नाही. कारण जर परीक्षा ठरलेल्या दिवशी घ्यायची होती तर तुम्हाला यंत्रणा तयार करता का नाही आली? खरं म्हणजे खूप मोठी घोडचूक असून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण मुख्यमंत्री केवळ विद्यार्थ्यांच्या भावनांची खेळले नाही येत तर ते खेळले आहे विद्यार्थ्यांच्या गरीब कुटुंबांसोबत सुद्धा.
उद्धव ठाकरे सहज बोलून गेले, पुढच्या आठ दिवसात मी एमपीएससी ची परीक्षा घेणार. पण पुढचे आठ दिवस जे विद्यार्थी उपाशी आहे त्या विद्यार्थ्याकडे उद्धव ठाकरे बघणार आहेत की नाही? ज्या ज्या विद्यार्थ्यांचे दोन वेळचे खायचे हाल होतात त्या विद्यार्थ्यांकडे मुख्यमंत्री बघणार आहेत की नाही? मुख्यमंत्र्यांच्या मुलाची प्रॉपर्टी जर करोडो रुपयाची आहे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येका मुलाची प्रॉपर्टी एक करोड रुपया ची नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोण सांगणार?
काही दिवसांपुर्वी एका टीव्ही कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांची थट्टा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की मला बजेट समजत नाही. उद्धव ठाकरे यांना बजेट समजत नाही म्हणून उद्धव ठाकरे सर्वसामान्य गरीब मुलांच्या बजेट का बिघडवत आहेत? असे काही प्रश्न इथे उपस्थित झाले आहेत.
चिन्मय जगताप

1 thought on “विशेष लेख – “म्हणून गरिबांची मुलं एमपीएससी कशी देतात ? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती नाही”

 1. चिन्मय सर आपण केलेली टिप्पणी ही खुप समर्पक आहेत..खुप छान विषय मांडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat