April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

कल्याण डोंबिवलित ‘सातच्या आत घरात’

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कल्याण/ डोंबिवली दि.10 मार्च : कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येप्रश्नी केडीएमसी प्रशासनाने अखेर कठोर निर्बंध लागू केले आहेत ज्यात गुरुवार पासून दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न आणि हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. हे लॉकडाऊन नसून निर्बंध लागू करण्यात आल्याचेही यावेळी पालिका आयुक्तांनी बोलताना सांगितले.

कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोना रूग्णसंख्येचा आकडा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल ३९२ इतक्या मोठ्या रुग्णसंख्येने संपूर्ण प्रशासन थबकून गेलं. कारण गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजेच ५ महिन्यांनंतर इथल्या कोवीड रुग्णसंख्येने ३०० चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. तर उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शिव मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. केवळ पूजा करण्यासाठी ही मंदिरं उघडली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे कोवीड रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आले असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे पेशंट फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून हे असतील निर्बंध…अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवणे, शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे, खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी, हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे, पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार, पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार, भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार, लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार, लग्न हळदी समारंभ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, मास्क घातलेच पाहिजेत, नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat