April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

….म्हणून राज ठाकरे नाशिकचा बालेकिल्ला राखणारच

1 min read
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षाला ज्या शहराने सर्वात जास्त प्रेम दिलं. ज्या शहराने सर्वाधिक आमदार दिले. ज्या शहराने महापालिकेची सत्ता दिली. त्या शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगमन झालं आहे. या झालेल्या आगमनामुळे विरोधकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आहे. आणि राज ठाकरे म्हणजेच मनसेची सत्ताही नाशिक मध्ये पुन्हा येणारच असे म्हटले जात आहे.

नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या महापालिकेची किल्ली दिली. न भूतो न भविष्यती असा विकास कसा असतो हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिककरांना दाखवून दिले. नाशिकमध्ये झालेल्या विकास कामांची नोंद त्यावेळेस खुद्द उद्योजक रतन टाटा यांनी देखील घेतली.मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योग पत्त्याने नाशिकमध्ये पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला. महेंद्र सारख्या बलाढ्य उद्योग समूहाने सुद्धा नाशिक मध्ये आपलं भांडवल आणलं. त्याचं कारण होतं हे त्यांना माहिती आहे की राज ठाकरे हा माणूस त्यांनी दिल्या पैशाचं सोनंच करेल आणि राज ठाकरे यांनीच सोनं केलं देखील.

पर 2019 सालि एक मोठी लाट आली. लाटे खाली वाहून गेले मनसेही वाहून गेला. खरं म्हणजे मनसे गेल्याच दुःख हे नाशिककरांना जास्त झाला. कारण आजही आपण जेव्हा नाशिकमध्ये जातो तेव्हा ते आपल्याला म्हणतात. की राज साहेबांनी केलेला विकास अजून कुणीही म्हणजे खुद्द नरेंद्र मोदी नाशिकचे महापौर झाले तरीही ते करू शकणार नाहीत इतकं प्रेम इतकी आस्था नाशिककरांची राज ठाकरेंवर आहे आणि त्यांनी मागच्या महापौर पदाच्या निवडणुकीत किंवा महापालिका निवडणुकीत राज ठाकरे किंबहूना मनसेला पाडून एक मोठी चूक केली आहे असं खुद्द नाशिककरांना वाटतं.

यामुळे राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा हा विजयी दौरा ठरणार आहे आणि येत्या काळात नाशिकमध्ये मनसे शिवाय कोणताही पर्याय उरणार नाही हा आत्मविश्वास राज ठाकरे नाशिक करणे देऊन जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat