April 13, 2021

Know About Them

Its good to know about someone

अभाविप जळगाव तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन व व्याख्यानाचे आयोजन.

1 min read
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी ९ वाजता रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले या वेळी प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर मंत्री आदेश पाटील, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, पवन भोई, संकेत सोनवणे, आकाश पाटील,जितेश चौधरी,जयेश माळी, चिराग तायडे, चैतन्य जुनारे, नितेश चौधरी, मयूर अलकरी, उपस्थित होते.
त्यानंतर १० वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव च्या छत्रशक्ती कार्यालयात प्रा. जुगल घुगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू या विषयावर व्याख्यान दिले त्या वेळी त्यांनी बोलताना भारतीय संविधानाचे महत्त्व, समरसता बदल माहिती दिली तसेच शिक्षणाचे महत्त्व सांगितले, संघटित असण्याचे महत्त्व समजावून सांगितले, आंबेडकरांच्या “शिका संघटित व्हा संघर्ष करा ” हा विचार आज किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले,आम्ही प्रथमता भारतीय व अंतीमता भारतीय आहे, प्रथम देश व अंतिम मी असे अनेक पैलू बादल अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन महानगर मंत्री आदेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
Open chat