करोना पर्व फळले
1 min read
एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था करोना काळात हेलकावे खात असतांना भारतीय उद्योगपतींची नौका मात्र सुसाट अब्जावधी आकडे पार करीत आहे.’हरून ग्लोबल रिच लिस्ट सर्व्हे २०२१’ नुसार करोना काळत देशात चाळीस अब्जाधीश उद्योगपतींची भर पडली आहे.त्या मुळे देशातील अब्जाधीश यादी आता वाढून १७७ वर पोहोचली आहे.अंबानी यांना करोना पर्व लाभदायक झालेले असून, रिलायन्स इंडस्ट्रीच्या संपत्तीत २४% घसघशीत वाढ झालेली आहे.
‘सिरम इन्स्टिट्यूटचे’ सीईओ कोव्हीशिल्ड या लसीचे निर्मिती प्रमुख सायरस पुनावाला देशात पाचव्या क्रमांकावर आले आहेत.जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानी आलेले आहेत.
गुजराथस्थित असलेले अदानी यांना तर करोना पर्व खूपच लाभदायक असेच एकंदरीत आकडेवारीतून दिसत आहे.गेल्या वर्षी पेक्षा त्यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ होऊन २.३४ लाख कोटी (३२ अब्ज डॉलर) पोहोचली आहे.तसेच एच सी एल चे शिव नाडर सुद्धा आघाडीवर आहेत.मुंबईत सर्वाधिक ६१,नवी दिल्ली ४०, बंगलोर २२ नव्या अब्जावधी लोकांची नगरी झाली असून,एकूणच करोना पर्व सर्वसामान्यांना पेक्षा उद्योगपतींना लाभदायक असाच गेलेला आहे हे सर्व करोना कृपेमुळे की आणखीन कशाच्या कृपेमुळे?